गोशाळेचा सर्वांगीण विकास
महाराष्ट्रातील सर्व गोशाळांना संघटित करणे व गोशाळा समन्वय, प्रशिक्षण, संमेलन आणि अनुदानासाठी प्रयत्न म्हणजेच गोशाळांचा सर्वांगीण विकास हे गोशाळा महासंघाचे मुख्य उद्देश आहे. सन 2017 पासून गोशाळा महासंघाचे कार्य सुरू झाले आहे. सुरुवातीला गोशाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. नंतर जिल्हा स्तरावर गोशाळा संचालकांच्या ( ट्रस्टी ) बैठका घेण्यात आल्या. अमरावती, नांदेड, पुणे आणि जळगाव येथे गोशाळा संचालकांचे ( ट्रस्टी ) प्रांत स्तरावर संमेलन घेण्यात आले. प.पू. डॉ. हेडगेवारजींनी गोमातेचे रक्षण केलेल्या स्थळी पुसद, जिल्हा यवतमाळ येथे गोशाळा महासंघाच्या प्रयत्नाने गोरक्षा स्थळी स्मारक निर्माण करण्यात आले आणि गोशाळा महासंघाने गोळाशाळांना अनुदान मिळण्याकरिता विविध आंदोलने केली, त्या आंदोलनांच्या फलस्वरुप महाराष्ट्रात गोसेवा आयोगाची स्थापना झाली. गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजने अंतर्गत 180 गोशाळांना अनुदान प्राप्त झाले. दररोज प्रति दिन प्रति गाय ५० रुपये चारा अनुदान ( परिपोषण ) योजना मंजूर झाली आणि गोमातेला राज्यमातेचा दर्जा प्राप्त झाला. हे सर्व गोशाळा महासंघाच्या आंदोलनाचे यश आहे. भविष्यात गोशाळा महासंघातर्फे गोशाळांना नियमित अनुदानासाठी प्रयत्न,प्रशिक्षण केंद्र, 24 तास हेल्पलाईन, गोशाळा समस्या निवारण केंद्र आणि गोचर भूमी रक्षण संवर्धनाचे कार्य केले जाईल.





























महासंघ महासंघ स्थापना
गोशाळा सर्वेक्षण कार्य प्रारंभ
जिल्हास्तरीय गोशाळा बैठका
राज्यस्तरीय गोशाळा संमेलन
गोसेवा आयोग निर्माण करिता आंदोलन
गोशाळा संचालक प्रशिक्षण कार्यशाळा
परिपोषण योजना करिता आंदोलन
गोशाळा महासंघ महाराष्ट्र, 301 श्रीकृष्ण विहार, हिरवळ लॉन च्या बाजूला, कठोर रोड, अमरावती, ४४४६०४
9371405104
9604841404
9860054749
gomaharsangh@gmail.com
contact@goshalamaharsanghmh.org